बेकारीने त्रस्त झालेला एक तरुण शेवटी सर्कस मॅनेजरकडे येऊन काम मागू लागला. ‘मला कोणतेही काम चालेल.’ ‘आमच्याकडे फक्त एकच जागा आहे. पण काम असे की तारेवरून चालणे, पण खाली जाळी असणार नाही त्या जागी पिंजऱ्यात बंदिस्त एक सिंह राहील. काम जोखमीचे आहे. आहे कबूल? हताश तरुण नाईलाजाने तयार झाला.
रात्री शो सुरू असताना तरुण शिडीवरून वर गेला व तारेवरून चालू लागला. त्याचे पाय लटलट कापू लागले. काही अंतर गेल्यावर सिंहाला पाहून त्याचे पाऊल चुकले व तो किंकाळ्या मारत पिंजऱ्यात खाली पडला. तो पडताच सिंह त्याच्यावर चाल करून जाताच, ‘मेलो! मेलो! हा आता मला खाणार- वाचवा! वाचवा! सिंह म्हणाला, ‘चूप मुर्खा! नाही तर दोघांच्याही नोकऱ्या घालवून बसशील.
No comments:
Post a Comment