बंडय़ा आणि गुंडय़ा जंगलात भटकायला गेले. थकल्यामुळे योग्य जागा पाहून झोपी गेले. मध्यरात्री बंडय़ा उठला आणि गुंडय़ाला उठवीत म्हणाला बघ मित्रा तुला काय दिसत आहे? गुंडय़ा आकाशाकडे पाहून म्हणाला, ‘आकाशात सुंदर नक्षत्रे, ग्रह, तारे दिसत आहेत. खगोलशास्त्राच्या दृष्टीने आपणास कळते की, आपल्यासारखी ग्रहमालिका आहे, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास शनि-सिंह राशीत दिसतो आहे आणि चंद्राच्या स्थितीवरून आता रात्रीचे २ वाजले आहेत. तुला काय वाटते बंडय़ा?’ ‘खरे तर आपला तंबू चोरीला गेला आहे.’ बंडय़ा म्हणाला.
No comments:
Post a Comment